…अखेर मोती तलावात आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला…

2

सावंतवाडीतील घटना;मालवणच्या आपत्कालीन पथकाला यश…

*सावंतवाडी ता.०१:* येथील मोती तलावात आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल १८ तासांनी बाहेर काढण्यास मालवण येथील आपत्कालीन पथकाला यश आले आहे.उमेश यादव (४३) रा.सालईवाडा,असे त्याचे नाव असून तो विज वितरण कंपनीचा खाजगी  ठेकेदार होता.त्याने नेमकी आत्महत्या का केली याबाबत प्रश्नचिन्ह आहे.दरम्यान तलावात आत्महत्या केल्याची माहिती मिळतात घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.तर बाबल अल्मेडा रेस्क्यू टीमच्या मदतीने काल शोध मोहीम राबवली होती.दरम्यान त्यांना उशीर झाल्यामुळे या शोध मोहिमेत अपयश आले होते.त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी मालवण येथून आपत्कालीन स्कुबा पथक रात्री उशिरा सावंतवाडी पाठविले.त्या पथकाकडून आज सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली होती.दरम्यान मृतदेह बाहेर काढण्यास त्या पथकाला यश आले.याबाबतची माहिती पोलीस उपनिरीक्षक अमित गोते यांनी दिली.

3

4