शिरोड्यात आलेल्या स्वामींच्या पादुकांचे भाविकांनी घेतले दर्शन…

2

वेंगुर्ले.ता.१:श्री स्वामी मी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट आयोजित श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा आज शिरोडा येथे सकाळी दाखल झाली. पालखी मधून आलेल्या स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

शिरोडा बाजारपेठेतून दिनेश बर्डे यांच्या निवास स्थानापर्यंत पालखी सोहळा संपन्न झाला. स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत होते. दुपारी श्री. बर्डे यांच्या निवासस्थानी पालखी पोहचल्यावर तेथे भजन, नामस्मरण, महाआरती व त्या नंतर महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर ही पालखी परिक्रमा वेंगुर्ले येथील बसस्थानका कडील साई मंदिराकडे रवाना झाली आहे.

2

4