कामळेवीर येथे आंबा – काजू बागेला आग : लाखोंचे नुकसान

2

वेंगुर्ले : ता.१: कामळेवीर बाजारपेठ येथिल संदीप वेंगुर्लेकर व गुरुनाथ गवळी यांच्या आंबा – काजू बागेला आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. सदर घटना समजताच वेंगुर्ले न. प. चा अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र बागेचे मोठे नुकसान झाले आहे.
कामळेवीर बाजारपेठेला लागून असलेल्या संदीप वेंगुर्लेकर व गुरुनाथ गवळी यांच्या आंबा-काजू बागेत दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागली. सदर आगीची माहिती मिळताच संदीप वेंगुर्लेकर, गुरुनाथ गवळी, उमेश पुनाळेकर, श्रीपाद सामंत, यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. सदर आगीचा ओघ जास्त असल्याने वेंगुर्ले न.प. च्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले असता अग्निशमन दलाचे अधिकारी पांडुरंग नाटेकर, सागर चौधरी, वाहन- चालक गौरव आरेकर, उमेश वेंगुर्लेकर व कर्मचारी हेमंत चव्हाण, पंकज पाटणकर यांनी शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आंबा काजूचे आगीत जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तेथील ग्रामस्थांनी
सदर आगीचे कारण हे तेथील असलेल्या विद्युत वीज वाहिन्यांच्या घर्षणाने ठिणगी पडून लागली असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

4