कीर्तन महोत्सव आयोजित करणाऱ्या संस्थांचे कार्य कौतुकास्पद : नगराध्ययक्ष दिलीप गिरप…

2

वेंगुर्ला.ता.१: वेंगुर्ल्यामध्ये कीर्तनाचा असणारा श्रोता वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. गेली आठ वर्षे कीर्तन महोत्सव आयोजित करुन सामाजिक संस्थांनी तसेच ट्रस्टने कीर्तन श्रोत्यांना एक पर्वणीच उपलब्ध करुन दिली आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

वेंगुर्ला ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान व श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सलग आठव्या वर्षी आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन आज येथील रामेश्वर मंदिरात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समितीच्या सभापती अनुश्री कांबळी, नगरसेवक विधाता सावंत, सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळू देसाई, श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दाजी परब, सचिव रविद्र परब, प्रकाश परब, ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष अरुण गोगटे, चंद्रकांत फाटक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा ब्राह्मण मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड.श्रीकृष्ण ओगले यांनी केले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मुंबई येथील ह.भ.प.सौ.मंजुषा भावे यांचे ‘स्वातंत्र्यविर सावरकर‘ विषयावर सुंदर असे किर्तन सुरू झाले आहे. या कीर्तनाला श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

4