मोती तलावात आत्महत्या करणा-या तरुणाची ओळख पटवण्यास अपयश…
सावंतवाडी ता.०१: येथील मोती तलावात आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा मृतदेह अद्याप पर्यंत सापडलेला नाही.तो मृतदेह नेमका कोणाचा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरातील एका तरुणाने आत्महत्या केल्याचे समजते,परंतु पोलिसात अद्यापपर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.दरम्यान पालिका व पोलीस प्रशासनाकडून बाबल अल्मेडा टीमच्या सहाय्याने सुरू करण्यात आलेली शोध मोहीम अखेर थांबविण्यात आली.उद्या पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.
येथील कुटीर रुग्णालयाच्या समोर एका अज्ञात तरूणाने उडी घेवून आत्महत्या केली. मात्र त्याचा मृतदेह अद्याप पर्यंत सापडलेला नाही.त्याचा शोध घेण्यासाठी तब्बल तीन-साडेतीन तास शोध मोहीम राबविण्यात आली.परंतु मृतदेह काही मिळालेला नाही.त्यामुळे अखेर ही शोध मोहीम थांबविण्यात आली आहे.दरम्यान उशिरापर्यंत घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी होती.