वेंगुर्ले-तुळस येथील घटना;गंभीर दुखापतीमुळे उपचारापूर्वीच निधन…
सावंतवाडी ता.०१:
नारळाचे झाड तोडत असताना वरून खाली पडल्याने गंभीर जखमी होवून वेंगुर्ले-तुळस येथील एका वृध्दाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.ही घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.श्रीधर गणेश आरमारकर(६०)रा.रेवटीवाडी,असे त्याचे नाव आहे.दरम्यान त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते मृत झाल्याचे घोषित केले.याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,श्री.आरमाकर हे आपल्या घरा नजीक बागायतीत नारळाचे झाड तोडत होते.ते झाड तोडण्यासाठी झाडावर चढले होते.दरम्यान अचानक त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळले.यात त्यांना गंभीर दुखापत झाली.त्यानंतर त्यांना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.दरम्यान तेथे प्राथमिक उपचार करून उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे घोषित केले.