दुचाकीची-कारला धडक बसून कुणकेरी येथील युवक गंभीर…

2

झाराप- जांभळ स्टॉप येथे घडला अपघात; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल…

सावंतवाडी ता.०१: उभ्या कारला मागून धडक बसल्याने कुणकेरी येथील युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.हा अपघात आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास झाराप- जांभळ स्टॉप परिसरात घडला.अक्षय सद्गुरू चव्हाण(२५) असे त्या युवकाचे नाव आहे.अपघाता नंतर झाराप माजी उपसरपंच अजित मांजरेकर यांनी जखमीला मदत कार्य करत सामाजिक कार्यकर्ते विकास तेंडुलकर यांच्या गाडीतून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.दरम्यान त्याला अधिक उपचारासाठी गोवा- बांबुळी रुग्णालय हलविण्यात आले आहे.याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी दिली.

4