प्रवीण दरेकर;मच्छीमारी,पर्यटन आणी फलोउत्पादन आदी प्रश्नाकडे लक्ष देणार…
सावंतवाडी.ता,०२: येथील
भविष्यात कोकण भाजपचा बालेकिल्ला होईल, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. सावंतवाडीत मिळालेला विजय ही परिवर्तनाची नांदी आहे. असा विश्वास विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे व्यक्त केला.
कोकणासाठी एक मंत्रिपद देऊन महाविकास आघाडीकडून कोकणवासीयांची बोळवण करण्यात आलेली आहे.त्यामुळे आता आमचा लढा हा कोकणातील प्रलंबित प्रश्नांच्या विरोधात असणार आहे. मच्छीमार,पर्यटन आणि फलोउत्पादन यासारख्या प्रश्नावर आमचा विशेष लक्ष असेल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री दरेकर आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत.आज पर्णकुटी विश्रामगृहावर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी ते बोलत होते.याप्रसंगी माजी आमदार राजन तेली, प्रमोद जठार, तालुकाध्यक्ष महेश सारंग, महेश धुरी, प्रमोद गावडे, प्रसाद अरविंदेकर,मोहिनी मडगावकर,रवी मडगावकर,पुखराज पुरोहित आदी उपस्थित होते.