जिल्हास्तरीय समूह गीत स्पर्धेत कास प्राथमिक शाळेचे यश

2

पियुष परबला सर्वोत्कृष्ट बाल तबला वादक पुरस्काराने सन्मानित…

बांदा ता.०२: जिल्हास्तरीय समूहगीत गायन स्पर्धेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-कास या शाळेतील संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.तर या संघाला तबला साथ देणाऱ्या कु.पियुष परब याला जिल्ह्यातील “सर्वोत्कृष्ट बाल तबलावादक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ही स्पर्धा नुकतीच ओरोस येथे संपन्न झाली.यात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या आठही तालुक्यांचे संघ सहभागी झाले होते.
विजेत्या संघाला जिल्हा परिषद केंद शाळा बांदा नंबर 1चा विद्यार्थी कु .पियुष सच्चीदानंद परब याने या तबला साथ दिली.दरम्यान पियुष परब याला या स्पर्धेत ” जिल्हातील सर्वोत्कृष्ट बाल तबला वादक “पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .हा पुरस्कार संगीत महर्षि मा.माधव गावकर यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी एकनाथ आम्बोकर शिक्षक जे .डी .पाटील,रंगनाथ परब,श्री.पालव यांच्या उपस्थितीत देण्यात आला.या यशा निमित्त त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

5

4