भाजपा विजयाच्या नांदीला सावंतवाडीपासून सुरूवात…

219
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रविण दरेकर;महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही…

सावंतवाडी.ता,०२: भाजपच्या परिवर्तनाची नांदी कोकणात सावंतवाडी पासून सुरु झाली आहे. त्यामुळे येथील पालिकेला निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास विरोधी पक्षनेते तथा आमदार प्रवीण दरेकर यांनी आज येथे व्यक्त केला.महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही. त्यामुळे भविष्यात भाजपच सत्तेवर येईल असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री दरेकर यांनी आज येथील नगरपालिकेला भेट दिली.यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी आपल्या नगरसेवकांच्या माध्यमातून त्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित नगरसेवक पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना श्री दरेकर बोलत होते.
ते म्हणाले आपण कोकणाचा भूमिपुत्र आहे.त्यामुळे येथील जनतेचा विकास व्हावा या उद्देशाने आपले प्रयत्न सुरू आहे. गेली अनेक वर्षे भाजपाने याठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला.परंतु तब्बल २३ वर्षांनी सावंतवाडी नगराध्यक्षपदी भाजपला संधी मिळाली आहे.ही परिवर्तनाची नांदी आहे.येत्या काळात ज्याप्रमाणे “चांदा ते बांदा”योजना राबविण्यात आली तशी बांदया पासून चांदया पर्यंत भाजप आता वाढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी आपण सावंतवाडी पालिकेसाठी ५० लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.तत्पुर्वी आमदार रमेश पाटील यांनी आपण २५ हजार रुपये देत असल्याचे सांगितले.यावेळी आमदार राजन तेली यांनीही शुभेच्छा दिल्या.ते म्हणाले सावंतवाडी शहरात प्रकल्प प्रलंबित विकासकामे अंडरग्राउंड वीज वाहिनी भुयारी गटार हे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.त्या दृष्टीने सावंतवाडी करांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळतील यासाठी आपले प्रयत्न राहणार आहे.कचरा विलिगीकरणाचा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
संजू परब म्हणाले आपल्या नगराध्यक्ष पदाची धुरा घेतल्यानंतर दुसऱ्यादिवशी याठिकाणी आणि विरोधी पक्ष नेते येत आहेत.आणि ते आपल्याला निधी देत आहेत.हा दुग्ध शर्करा योग आहे.भविष्यात अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात येथील जनतेच्या विकासासाठी वरिष्ठ नेत्यांनी उपलब्ध करून द्यावा.
यावेळी परीमल नाईक, मनोज नाईक,समृद्धी विरनोडकर, दिपाली भालेकर, राजू बेग, यांच्यासह मुख्याधिकारी संतोष जिरगे,आसावरी शिरोडकर, भाऊ भिसे,दत्तप्रसाद कुडपकर, तानाजी पालव आदी उपस्थित.

\