कोमसापचे जिल्हास्तरीय साहीत्य संमेलन ५ तारखेला दोडामार्गात…

2

दोडामार्ग.ता,०२: कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय १६ वे साहित्य संमेलन रविवारी ( ता .५) दोडामार्ग येथे होत आहे .दोडामार्ग इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील संत सोहिरोबानाथ आंबिये साहित्य नगरीत सकाळी नऊ ते पाच या वेळेत संमेलन होईल.कोमसापच्या दोडामार्ग बांदा शाखेने संमेलनाचे आयोजन केले आहे .
जिल्हाधिकारी तथा गझलकार डॉ .दिलीप पांढरपट्टे संमेलनाचे अध्यक्ष तर कळणे मुक्तद्वार ग्रंथालयाचे अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी संमेलनाध्यक्ष असतील.पंचायत समिती सदस्य तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी संमेलनाचे उद्घाटक आहेत.आमदार तथा माजी वित्त व गृह राज्यमंत्री दीपक केसरकर आणि कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची विशेष उपस्थिती असेल .
प्रमुख पाहुणे म्हणून कसई दोडामार्गच्या नगराध्यक्ष लीना महादेव कुबल , उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण , पंचायत समिती सभापती संजना संदीप कोरगावकर , उपसभापती धनश्री गणेशप्रसाद गवस , शिक्षण व आरोग्य सभापती डॉ .अनिशा शैलेश दळवी , जिल्हा परिषद सदस्य संपदा गणपत देसाई व श्वेता कोरगावकर , सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती शितल राऊळ यांच्यासह कोमसापच्या केंद्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रा .अशोक ठाकूर , कार्याध्यक्ष नमिता कीर ,केंद्रीय कार्यवाह शशिकांत तिरोडकर , विश्वस्त न्यायमूर्ती भास्कर शेट्ये , विश्वस्त अरुण नेरुरकर आणि रमेश कीर आदी उपस्थित राहणार आहेत .
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केला जाणारं आहे .जिल्ह्यातील साहित्य प्रेमींनी संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मंगेश मसके , जिल्हा समन्वयक रुजारिओ पिंटो , कार्यवाह भरत गावडे , सहकार्यवाह विठ्ठल कदम , दोडामार्ग बांदा शाखाध्यक्ष प्रभाकर धुरी , कार्यवाह प्रकाश तेंडॊलकर यांनी केले आहे .
ग्रंथदिंडी,शोभायात्रेचे आकर्षण साहित्य संमेलनाचा एक भाग असलेली ग्रंथदिंडी शोभायात्रेसह काढली जाणार आहे .सकाळी नऊ वाजता दोडामार्ग केंद्रशाळेकडून दिंडी आणि शोभायात्रेला सुरवात होईल.दोडामार्ग हायस्कूलमधील साहित्य संमेलनस्थळापर्यंत ती जाईल .ग्रंथ दिंडी आणि शोभायात्रा उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असेल .
प्रकट मुलाखत आणि बरेच काही ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची प्रकट मुलाखत ऐकण्याची संधी जिल्हावासीयांना मिळणार आहे .शिवाय नामवंत कवींबरोबरच नवकवींही आपल्या कविता सादर करतील .भारुड , कथाकथनाबरोबरच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित परिसंवादही असेल.

4