कास येथील माऊली मंदिराची फंडपेटी चोरट्याने फोडली…

2

रोकड लंपास;अज्ञाताविरोधात बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

बांदा.ता,०२: कास येथील माऊली मंदिरातील फंडपेटी फोडून अज्ञात चोरट्याने अंदाजे तीन हजार रुपयाचा रोकड लंपास केली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली या बाबतची तक्रार देवस्थानचे मानकरी बाबली पंडित यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात अंधाराचा फायदा घेऊन संबंधित चोरट्यांने कटावणीच्या सहाय्याने फंडपेटी फोडल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

4