वेंगुर्ले.ता.२:
आजगाव येथील वाचनालयात शुक्रवार दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पहिल्या ‘संगीत प्रेरणा’ सभेचे आयोजन केले आहे. यावेळी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा ‘सांगीतिक जीवन प्रवास’ कु. मुग्धा सौदागर आपल्या गायनातून उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे.
पंचक्रोशीत संगीत विषयक अधिक जागृती व्हावी, स्थानिक कलाकारांना संधी उपलब्ध व्हावी, वाद्य संगीताला व्यासपीठ मिळावे या हेतूने संगीत सभेची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. ‘अंतर्यामी सूर गवसला’ या नावाने होणाऱ्या या पहिल्या संगीत सभेत संगीतकार श्रीनिवास खळे यांचा ‘सांगीतिक जीवन प्रवास’ कु. मुग्धा सौदागर आपल्या गायनातून उलगडून दाखविण्याचा प्रयत्न करेल. यावेळी तीला तबला साथ अक्षय सरवणकर करेल,तर निवेदन विनय सौदागर यांचे असेल. ध्वनी संयोजनाची जबाबदारी युसुफ आवटी यानी घेतली आहे. तरी विनामूल्य प्रवेश असलेल्या या संगीत कार्यक्रमास सर्व संगीत प्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.