पादचाऱ्यांना जखमी केल्याप्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता…

105
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ओरोस ता.०२: पादचार्‍यांना ठोकर देऊन त्याला जखमी केल्याच्या आरोपातून कोल्हापूर शिवाजी पेठ येथील संजय धोंडीराम साळोखे (40) याची मुख्य न्यायदंडाधिकारी ए एम फडतरे यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपीच्या वतीने वकील अश्पाक शेख यांनी काम पाहिले.

मुंबई-गोवा महामार्गावर कसाल येथील ट्राफिक चौकीकडील रस्ता पादचारी प्रज्ञेश अनिल सावंत हा ओलांडून पलीकडे जात होता. महामार्गावर या ठिकाणी वाहनांची तपासणी ही ट्रॅफिक पोलिसांकडून सुरू होती. याचवेळी संजय साळोखे आपल्या ताब्यातील ट्रक एम एच 23 डब्ल्यू 6289 घेऊन कुडाळ ते कणकवलीच्या दिशेने जात होता. दरम्यान ट्रकची ठोकर पादचाऱ्याला बसली होती व तो जखमी झाला होता 16 डिसेंबर 2013 रोजी अपघात घडला होता करण्यात आला होता

याप्रकरणी साळोखे याच्या विरोधात हयगयिने व बेदरकारपणे वाहन चालून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात झालेल्या खटल्याच्या सुनावणी आरोपीविरुद्ध कोणताही सबळ पुरावा न्यायालयासमोर न आल्याने त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

\