ग्रामस्वच्छता अभियानात हुमरस ग्रामपंचायतीची बाजी…

243
2

ओरोस ता.०२
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छ्ता अभियान 2018-19 मधील कोकण विभाग स्तरीय स्पर्धेचा निकाल विभागीय कोकण आयुक्त शिवाजी दौड यांनी जाहिर केला आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुमरस (ता. कुडाळ) या ग्राम पंचायतीने प्रथम, रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल (ता. गुहागर) ग्राम पंचायतीने द्वितीय तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयनोडे हेवाळे ग्राम पंचायतीने तृतीय क्रमांक मिळविला आहे. विभागीय स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने डबल धमाका केला असून या दोन्ही ग्राम पंचायतींचे जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी अभिनंदन केले आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छ्ता अभियान 2018-19 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आलेल्या कुडाळ तालुक्यातील हुमरस व द्वितीय आलेल्या दोडामार्ग तालुक्यातील आयनोडे हेवाळे ग्राम पंचायतचे मूल्यमापन कोकण विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केले होते. कोकण विभाग स्तरासाठी झालेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यात प्रथम दोन आलेल्या ग्राम पंचायती स्पर्धेत होत्या. त्याचे मूल्यमापन करण्यात आले होते. त्याचा निकाल कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौड यांनी जाहिर केला आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने डबल धमाका केला आहे. हुमरस प्रथम तर आयनोडे हेवाळे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. या दोन्ही ग्राम पंचायतींना प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह मिळणार आहे. तर प्रथम आलेल्या हुमरस ग्राम पंचायतला 10 लाख रूपये तर तृतीय आलेल्या आयनोडे हेवाळे ग्राम पंचायतला 6 लाख रूपये मिळणार आहेत.

4