लैंगिक अत्याचार प्रकरणी देवगडातील एकाचा जामीन अर्ज फेटाळला…

2

ओरोस ता.०२:
लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्यावर मातृत्व लादल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या देवगड तालुक्यातील पेंढरी देऊळवाडी येथील नितीन गुरव 36 या संशयितांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश श्रीमती एस एस घोडके यांनी फेटाळून लावला आहे सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले
लग्नाचे आमिष दाखवत नितीन गुरव याने एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते तसेच त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता त्यातून ती मुलगी गरोदर होऊन 20 ऑक्टोबर रोजी ती एका बाळाची आई बनली होती याबाबतची तक्रार संबंधित पीडित मुलीच्या बहिणीने मुंबई येथील रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दिली होती त्यानुसार संशयित आरोपी वर भादवि कलम 376 (2)( एन) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,6,8 नुसार गुन्हा दाखल करून मुंबई पोलिसांनी तो गुन्हा विजयदुर्ग पोलिसांकडे वर्ग केला होता.
विजयदुर्ग पोलिसांनी 30 ऑक्टोबर रोजी आरोपी गुरव याला अटक केली होती संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत असून 17 डिसेंबर रोजी विजयदुर्ग पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले आहे त्यानंतर आपल्याला जामीन मिळावा यासाठी संशयित विशेष न्यायालयाकडे अर्ज केला होता हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

4