भंडारी महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून राजन रेडकर यांची नियुक्ती…

414
2

वेंगुर्ले.ता.२:
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून वेंगुर्ले तालुक्यातील रेडी गावचे सुपुत्र राजन रेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री. रेडकर यांचे भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरू आहे. कामानिमित्त मुंबईत राहणारे आणि पोलीस दलात काम केलेल्या श्री. रेडकर यांचे सामाजिक कार्य पाहून त्यांच्यावर भंडारी महासंघाने जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. महासंघाचे अध्यक्ष श्री. नविनचंद्र बांदिवडेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यांच्या या निवडीमुळे त्यांचे समाजातून अभिनंदन होत आहे. भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेचे जिल्हा अध्यक्ष दाजी नाईक तसेच सौरभ नागोळकर, सिद्देश शेलटे, लक्ष्मीकांत करपे, जगन्नाथ राणे, रवींद्र राणे, पृथ्वीराज राणे यांनीही त्यांचे आपल्या संस्थेच्या वतीने खास अभिनंदन केले आहे. दरम्यान वेंगुर्ले येथे भंडारी वधुवर सूचक मेळाव्याच्या नियोजना साठी तालुका अध्यक्ष रमण वायगणकर यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या वेंगुर्ले तालुका भंडारी एक्यवर्धक मंडळाच्या बैठकित रेडकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची रूपरेषा माहीत करून घेतली. यावेळी श्री. रेडकर यांच्या नियुक्ती बाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.

4