सावंतवाडी पोलिस ;उमेश यादव आत्महत्या प्रकरण, तपास एलसीबी कडे….
सावंतवाडी ता .०२: येथील मोती तलावात आत्महत्या करणा-या उमेश यादव यांचे आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.त्यांच्या आत्महत्येबाबत उलट सुलट चर्चा असल्यामुळे हे प्रकरण अखेर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आले आहे.याबाबत सावंतवाडीच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांनी दुजोरा दिला,मात्र चर्चेत असलेली “ती” चिट्ठी अद्याप पर्यंत पोलिसांना सापडलेली नाही,असे पोलिसांचे म्हणणे आहे.दरम्यान संबंधित कुटुंबाकडून चौकशी करण्याचे काम सुरू आहे,असे अधिकारी सौ.यादव यांनी सांगितले.
येथील वीज वितरण कंपनीत खाजगी ठेकेदार म्हणून काम करणाऱ्या उमेश यादव या तरुणाने काल दुपारी येथील मोती तलावात आत्महत्या केली होती. आज त्याचा मृतदेह सापडला.दरम्यान त्याने चिठ्ठी लिहून ठेवली आहे.त्यात राजकीय हेवेदाव्यातून त्याने आत्महत्या केली,अशी उलटसुलट चर्चा शहरात सुरू होती.या चर्चेनंतर हा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती घेतली असता पोलिसांनी आज संबंधित कुटुंबा कडून माहिती घेतली.मात्र त्यांना अद्याप पर्यंत चिट्ठी मिळाले नाही.याबाबत सौ.यादव म्हणाल्या आम्हीसुद्धा चिट्ठी मिळाल्याचे ऐकून आहोत.मृताच्या मुलीने चिठ्ठी असल्याचे आपल्या मामाच्या मुलाला सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात अद्याप पर्यंत आम्हाला चिट्ठी मिळाली नाही. तूर्तास ते कुटुंब दुःखात आहे .आम्ही तपास करत आहोत असे त्यांनी सांगितले.
दरम्यान याबाबत या घटनेचे तपासी अंमलदार अमित गोते यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले चिट्ठी मिळाली.असे आपण सुद्धा ऐकले आहे. घटनास्थळावर काल व आज मोबाईलच्या पाठीमागे असलेल्या प्लास्टिकच्या कव्हरमध्ये ती चिठ्ठी होती अशी चर्चा होती.मृताचा मोबाईल घरी होता. परंतु अद्याप पर्यंत पोलीस तपासात कुठेही निष्पन्न झालेले नाही त्यामुळे आमचा तपास सुरू आहे आता हा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकार्यांकडे गेला आहे पुढील तपास ते करत आहे.