प्रवीण दरेकर यांनी साधला, माणगाव खोऱ्यातील शेतक-यांशी संवाद…

137
2
Google search engine
Google search engine

कुडाळ.ता,०२: क्यार वादळामुळे नुकसान झालेल्या माणगाव खोऱ्यातील नुकसानग्रस्त शेतीचा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर व रमेश पाटील यांनी दौरा केला. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपण शासनस्तरावर प्रयत्न करू, शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई ही फसवी आहे असा आरोप यावेळी केला.श्री दरेकर पाटील आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी माणगावला भेट दिली.यावेळी प्रमोद जठार, राजन तेली, राजू राऊळ,संध्या तेर्से,विनायक राणे, चारूदंत्त देसाई, जयदेव कदम,दादा साईल,दादा बेळणेकर,राजा धुंदी,लाॅरेन्स मान्येकर,योगेश बेळणेकर, प्रतिभा घावनळकर भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.