सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्याला काँग्रेसचा पालकमंत्री देण्यात यावा अशी एकमुखी मागणी आज येथे झालेल्या जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आली.
दरम्यान काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी कौटुंबिक कारणामुळे राजीनामा दिला आहे,त्यामुळे त्यांच्या जागी पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष देण्यात यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस बैठक आज येथे माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या दीलीप नार्वेकरांचे अभिनंदन करण्यात आले
यावेळी साईनाथ चव्हाण, बाळा गावडे, श्रीकृष्ण तळवडेकर, जगन्नाथ डोंगरे, विद्याप्रसाद बांदेकर, देवानंद लुडबे, विभावरी सुकी, दादा परब, महेंद्र सावंत, आबा मुंज,महेश अंधारी, उल्हास मणचेकर ,महेंद्र सांगेलकर, विजय प्रभू, साक्षी कुबल, प्रकाश बोरकर, विधाता सावंत,आत्माराम सोपटे, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, दिलीप नार्वेकर ,राजू मसुरकर ,चित्रा कनयाळकर, अरुण टेंबुलकर , शंकर वस्त आदी पदाधिकारी उपस्थित होते