कणकवली शहरात पर्यटन महोत्सवाला प्रारंभ…

285
2
Google search engine
Google search engine

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याहस्ते उद्घाटन :शोभायात्रेने महोत्सवात रंगत

कणकवली, ता.०२: कणकवली नगरपंचायतीच्या पर्यटन महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. महोत्सवाच्या प्रारंभ कणकवली शहरातून चित्ररथांचा सहभाग असलेली शोभायात्रा काढण्यात आली. महोत्सव स्थळी शोभायात्रेचा समारोप झाल्यानंतर फुड फेस्टिव्हलचे उद्घाटन आणि त्यानंतर पर्यटन महोत्सवाचा शुभारंभ राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार नीतेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा परिषद अध्यक्ष समीधा नाईक आदींनी दीपप्रज्वलीत करून केला.
उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणात सुरू असलेल्या कणकवली पर्यटन महोत्सवाला आमदार नीतेश राणे, आमदार रमेश पाटील, नगराध्यक्ष समीर नलावडे, जिल्हा परिषद अध्यक्षा समीधा नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राजन तेली, मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, कणकवली उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत, संजना सावंत, रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने, भाजपचे राजू राऊळ, देवगड सभापती विकास पारकर, भाजप जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे, बांधकाम सभापती संजय कामतेकर, नगरसेवक अभिजित मुसळे, अ‍ॅड. विराज भोसले, बंडू हर्णे, सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, कविता सावंत, उर्मी जाधव, कविता राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने कणकवली शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात विविध प्रभागातून आलेल्या चित्ररथांमधून ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरी देखावे सादर करण्यात आले. स्वच्छता विषयक उपक्रमांच्या देखाव्यांनीही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.