राणेंच्या माध्यमातून कणकवली विकासात अग्रेसर…

120
2
Google search engine
Google search engine

समीर नलावडे: माजी पालकमंत्र्याकडून सत्तेचा दुरुपयोग

कणकवली, ता.०२:  खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे तसेच आमदार नीतेश राणे यांच्या माध्यमातून कणकवलीत विविध प्रकल्प साकारले जात आहेत. यात 15 कोटीचे स्पोर्ट कॉम्प्लेक्स, अद्ययावत उद्यान, मुंबईतील तारापोराच्या धर्तीवरील भव्य मत्स्यालय सुरू होणार आहे. यंदापासून आंतरराष्ट्रीय दर्जाची इंग्रजी माध्यमाची शाळा देखील कणकवलीत सुरू होत आहे. या उपक्रमांमुळे कणकवली शहर विकासात अग्रेसर असेल अशी ग्वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज पर्यटन महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात दिली. तर माजी पालकमंत्र्यांनी आम्हा लोकप्रतिनिधींना त्रास देण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग केला. पण सावंतवाडीच्या निकालातून जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. जनतेने त्यांना घरी बसण्यास भाग पाडले आहे असेही श्री.नलावडे म्हणाले.
पर्यटन महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात श्री.नलावडे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन महोत्सवाची सुरवात नारायण राणे यांनी केली. त्यानंतर आम्ही देखील नगरपंचायतीच्या माध्यमातून पर्यटन महोत्सव सुरू ठेवला आहे. मधली दोन तीन वर्षे काही गद्दारांमुळे पर्यटन महोत्सव झाला नव्हता. पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून कला, क्रीडा, इथली खाद्य संस्कृती जपण्याचा आम्ही प्रयत्न करतोय असेही ते म्हणाले.