विनायक राऊत;सीआयडीकडे तपास देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
सावंतवाडी.ता,०३: उमेश यादव यांची आत्महत्या हे राजकीय षडयंत्र आहे.आजपर्यंत मालवण-कणकवली मध्ये सुरू असलेले हे प्रकार आता सावंतवाडीत आले आहे.त्यामुळे या प्रकाराची चौकशी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी हा तपास सीआयडीकडे देण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.निवडणुकीच्या पैशाच्या देवाण-घेवाणीतुन हा प्रकार झाल्याचा संशय आहे.तशीच चर्चा आहे.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.बाळा वळंजू प्रकरणा नंतर आता हे प्रकरण राजकीय वादातून घडले आहे.असे श्री राऊत यांनी सांगितले.