विनायक राऊत; जिल्ह्यात मंत्रीपद न मिळाल्याने कोणीही नाराज नाही..
सावंतवाडी ता.०३: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्रिपद घेण्यासाठी युवा नेते तथा कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे इच्छुक आहेत.त्यादृष्टीने त्यांनी यापूर्वीच जिल्ह्याचा आढावा घेतला होता.ते पालकमंत्री झाले तर आनंदच आहे,असा विश्वास शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आज येथे व्यक्त केला.दरम्यान गेल्या पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिपद देण्यात आले होते.आता रत्नागिरीत दोन आमदार आहेत.त्यामुळे त्याठिकाणी मंत्रीपद देण्यात आले,त्यामुळे कोणाला डावलले, किंवा कोण नाराज असण्याचे कारण नाही,संघटना वाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत,असे यावेळी श्री.राऊत म्हणाले.ते आज सावंतवाडीत दौऱ्यानिमित्त आले होते.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, मायकल डिसोजा आदी उपस्थित होते
श्री. राऊत पुढे म्हणाले, याठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असा प्रश्न विचारला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले या ठिकाणी पालकमंत्री होण्यासाठी युवानेते खुद्द आदित्य ठाकरे इच्छुक आहेत. त्यातील शिवसैनिकांनी सुद्धा तशी मागणी केलेली आहे. त्यामुळे ते पालक मंत्री झाले तर आनंदच आहे .त्यामुळे कोणी नाराज असण्याचे कारण नाही .यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रीपद देण्यात आले होते .आता रत्नागिरीला संधी देण्यात आली आहे. भविष्यात त्या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नारायण राणे आमच्या दृष्टीने नगण्य आहेत.त्यामुळे त्यांची ताकत वाढले नाही. त्यांना भाजपचा आधार घ्यावा लागला हे नक्की आहे. पहिल्यांदा शिवसेना नंतर काँग्रेस पाणी आता भाजप असा त्यांचा प्रवास आहे. त्यांनी आपली ताकत एकट्याने दाखवावे असे राऊत म्हणाले.
यावेळी अनारोजीन लोबो, नागेंद्र परब, अण्णा केसरकर, प्रशांत कोठावळे, दिपाली वाडकर, भारती मोरे, अपर्णा कोठावळे, रुपेश राऊळ, शिवानी पाटकर,प्रशांत,कोठावळे,बाबू कुडतरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.