महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वेंगुर्ले शाखे तर्फे सभापती कांबळी यांचे अभिनंदन…

151
2

वेंगुर्ले.ता.३: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्ले च्या वतीने वेंगुर्ले तालुका नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सभापती कांबळी यांनी वेंगुर्ले तालुक्यातील शैक्षणिक प्रगती हेच आपले महत्वाचे उद्दिष्ट आहे. यासाठी आपणांस सर्वतोपरी सहकार्य करणार असे सांगितले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वेंगुर्लेचे अध्यक्ष श्री संतोष परब यांच्यासह उपाध्यक्ष श्री सिताराम नाईक, प्रवक्ता तथा शिक्षक पतपेढी संचालक श्री. त्रिंबक आजगावकर, महिला आघाडी प्रमुख श्रीम. प्रतिमा पेडणेकर, जिल्हा संघटक श्रीम. लिना नाईक, श्री भूषण नाईक, श्री प्रकाश भोई, सल्लागार श्री. कांडरकर सर, सहसचिव श्री ज्ञानेश्वर हरमलकर, प्रसिद्धी प्रमुख श्री प्रसाद जाधव, श्री किरण मुडशी, श्रीम दिपा वेंगुर्लेकर, श्रीम नेहा गावडे, श्रीम रेश्मा वरसकर, श्रीम स्नेहा परब, श्रीम शामल मांजरेकर, श्रीम वेंगुर्लेकर, श्रीम कृतिका राऊळ, सरचिटणीस श्री सिताराम लांबर आदी उपस्थित होते. तसेच शाळा वायंगणीच्या मुख्याध्यापिका श्रीम. श्वेता गवंडे या ही उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना सभापती म्हणाल्या की, तालुक्यातील शाळा व शिक्षक यांच्या अडचणी व समस्या दूर करण्यासाठी संघटनेला सहकार्य केले जाईल. आवश्यकते नुसार आपले सहकार्य घेऊन शैक्षणिक प्रगती करून वेंगुर्ले तालुक्याची शिक्षण श्रेत्रात उज्वल परंपरा निर्माण करूया असे आवाहनही सभापती कांबळी यांनी केले. दरम्यान नेट परीक्षेत उज्वल यश मिळविणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रा शाळा सुरंगपाणी नं. १ च्या उपशिक्षका श्रीम. शामल मांजरेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन सभापतींच्या हस्ते व सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

4