शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा पाया…

259
2

विनया सावंत;इन्सुली-नूतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

बांदा.ता,०३:
शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा पाया आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा. आपले ध्येय हे शालेय जीवनातच निश्चित करा. आपल्या ग्रामीण भागातून उच्च दर्जाचे अधिकारी झाले पाहिजेत, यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन प्रशालेला करू, असे प्रतिपादन द्वारकदास संघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मुंबईच्या प्राध्यापिका विनया सावंत यांनी इन्सुलि येथे केले.
येथील नूतन माध्यमिक विद्यालयात आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन करताना प्रा. सावंत बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर टाटा ग्रुप कंपनीचे महाव्यवस्थापक महेश सावंत, मुख्याध्यापक विनोद गावकर, पत्रकार निलेश मोरजकर आदी उपस्थित होते.
स्वागत मुख्याध्यापक गावकर यांनी केले. यावेळी सौ. सावंत यांनी विद्यार्थ्यांना करियर घडविताना काय करावे? प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेताना इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयात कसे पारंगत व्ह्यावे याबाबत मार्गदर्शन केले.
महेश सावंत म्हणाले की, सध्याचे युग हे स्पर्धात्मक असल्याने कौशल्यपूर्ण अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे. अशी बरीच क्षेत्रे आहेत ज्यामध्ये आपण उच्च भरारी घेऊ शकतो. शालेय जीवनात ‘टाईम मॅनेजमेंट’ महत्वाचे आहे.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. तसेच वैयक्तिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा पालव यांनी केले.

4