2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जिल्हा परिषद,सिंधुदुर्ग व रुग्णकल्याण समिती यांचे आयोजन…
बांदा.ता,०३:
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व रुग्णकल्याण समिती बांदा यांच्यावतीने सोमवार दिनांक ६ रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे. या शिबिरात हृदयाचे विकार व तपासणी, स्त्रियांचे आजार व निदान, लहान मुलांचे आजार व इलाज, त्वचा विकार उपचार, रक्तातील साखरेची तपासणी, अस्थीरोग व सांध्याचे आजार तपासणी, डोळ्यांचे विकार व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
यावेळी मोफत औषधांचे वाटपही करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4