सावंतवाडी तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत अंकिता नाईक यांचे यश…

206
2

बांदा.ता,०३:
मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत कोलगाव येथील अंकिता सुहास नाईक यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या साहित्यकृतीच्या परिक्षणावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत सविता अरुण परब (बांदा), पूनम मंगेश राऊळ (मळगाव) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. स्पर्धेचे उद्घाटन खेमराजचे माजी प्राचार्य बी. एन. तेली यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विठ्ठल कदम, संजना सावंत, उज्वला खानविलकर, वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबली नार्वेकर आदी उपस्थित होते.
विजेत्यांना रोख पारितोषिक व ग्रंथ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. स्पर्धेतील विजेत्यांची ५ जानेवारी रोजी कुडाळ येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

4