भाजपा करणार सावंतवाडीत “विजयोत्सव” साजरा…

2

प्रमोद जठार;अमर,अकबर,अॅन्थोनी फाॅर्मुला यशस्वी झाल्याचा दावा..

सावंतवाडी.ता,०३: येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ठरविण्यात आलेला अमर,अकबर,अॅन्थोनी हा फाॅर्मुला यशस्वी झाल्यानंतर ७ जानेवारीला सावंतवाडीत विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.याला खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे दिली.दरम्यान या सत्कारात सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब,बांदा सरपंच अक्रम खान आणी लाॅरेन्स मान्येकर यांचा समावेश आहे.या कार्यक्रमापुर्वी नागरीकांसोबत चहापानाचा कार्यक्रम होणार आहे.असे जठार यांनी सांगितले ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी राजन तेली,संजू परब,महेश सारंग,परिमल नाईक,नासिर शेख,प्रसाद अरविंदेकर,सिध्दार्थ भांबूरे,सुधीर आडीवरेकर,उदय नाईक,सत्या बांदेकर आदी उपस्थित होते. यावेळी जठार म्हणाले कालच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जनतेने संजू परब यांना बहुमताने निवडुन दिले.याची दखल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे.त्याच मुळे ते या कार्यक्रमासाठी येणार आहेत.

1

4