उमेश यादव आत्महत्या प्रकरणाचे गलिच्छ राजकारण नको…

2

प्रमोद जठार;गृहमंत्रीपद सत्ता तुमच्याकडे खुशाल चौकशी कराच..

सावंतवाडी.ता,०३: येथील आत्महत्या करणाऱ्या उमेश यादव यांच्या कुटुंबीयांना मानसिक आधाराची गरज आहे. त्यामुळे त्यांना आधार देण्याऐवजी त्याचे खासदार विनायक राऊत यांनी राजकारण करू नये. या प्रकरणाची खुशाल सीआयडीमार्फत चौकशी करावी असा प्रतिटोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे लगावला. मालवण कणकवली दहशत या ठिकाणी येऊ देऊ नका असे सांगणाऱ्या राऊत यांनी जिल्ह्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये.आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ते असा प्रकार करत असतील तर त्यांना जनता कधीही माफ करणार नाही असेही त्यांनी सांगितले. श्री जठार आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले सावंतवाडी यादव प्रकरणात शिवसेनेचे नेते राजकारण करू पाहत आहेत.त्या कुटुंबाला मानसिक आधाराची गरज आहे. मात्र त्याठिकाणी होत असलेले राजकारण घाणेरडे आहे.त्यामुळे अशा प्रकारचे राजकारण न करता त्या कुटुंबीयांना मानसिक आधार द्यावा.आम्ही आज त्या कुटुंबाची भेट घेतली.तसेच संबंधित कुटुंबाच्या शैक्षणिक खर्च उचलण्याची जबाबदारी भाजपाने दर्शविली आहे.त्यामुळे नाहक आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा गृहमंत्रीपद, सत्ता ही शिवसेनेकडे आहे.त्यामुळे त्यांनी कधी या घटनेचा तपास करावा. त्याला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत.
या ठिकाणी भाजपशी संबंध जोडण्याचा प्रकार होत असेल.तर तो चुकीचा आहे. सावंतवाडी सचिन विजय एकापाठोपाठ भाजपाचे झाल्यामुळे हा विजय शिवसेनेच्या नेत्यांना जिव्हारी लागला आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार सुरू आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी राजन तेली,संजू परब,महेश सारंग,परिमल नाईक,नासिर शेख,प्रसाद अरविंदेकर,सिध्दार्थ भांबूरे,सुधीर आडीवरेकर,उदय नाईक,सत्या बांदेकर आदी उपस्थित होते.

4