नगरपंच्यायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात…

2

म्युनिसिपल एम्प्लाॅईज युनियन तर्फे मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांना निवेदन…

वेंगुर्ले.ता.३: 
सर्व नगरपंच्यायती मधील कर्मचाऱ्याना सफाई कामगारांसह कायम सेवेत घ्यावे तसेच लाड व पागे कमीटीच्या निर्णयाप्रमाणे ईतरांना आरोग्यदाई जिवन देण्यासाठी अपले आरोग्य धोक्यात टाकून काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या वारसांना जात, पात, धर्म विचारात न घेता वारसा हक्काने नोकरी मिळावी यासह इतर मागण्यांचे निवेदन म्युनिसिपल एम्प्लाॅईज युनियन तर्फे मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे व नगरविकास मंत्री
श्री.एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.
पनवेल महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्याना ७ वा वेतन आयोग मिळावा यासाठी तसेच पनवेल येथील पुर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पनवेल मनपा मध्ये समावेशन करणे या सह राज्यातील नगर पालिकेच्या कर्मचाऱ्याच्या मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. दरम्यान माजी आमदार श्री. मनोहरशेठ भोईर यांच्यासह म्युनिसिपल एम्प्लाॅईज युनियनचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते अॅड. सुरेश ठाकूर आणि कामगार नेते श्री संतोष पवार यांनी मुखमंत्री ठाकरे आणि शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हे निवेदन दिले.

4