केसरकरांची यशस्वी शिष्टाई; न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलन,ग्रामस्थांचा इशारा…
दोडामार्ग.ता,०३: तळेखोल येथील दगडी खाण बंद करा या मागणीसाठी ग्रामस्थांनी केलेले आंदोलन आज तब्बल १६ व्या दिवशी मागे घेण्यात आले. यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यशस्वी शिष्टाई केली दरम्यान याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास पुन्हा सात दिवसानंतर आंदोलन करू असा इशारा यावी ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.तळेखोल गाव येथे चुकीच्या पद्धतीने दगड खाणीवर दगड उपसण्याचे काम सुरू आहे.
त्यामुळे परिसरातील लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.या खाणी बंद करण्यात याव्यात या मागणीसाठी गेले सहा दिवस ग्रामस्थांनी उपोषण केले होते.आज यावर तोडगा काढण्यात आला तत्पूर्वी मालकांचे प्रतिनिधी आणि आणि प्रशासन यांच्या उपस्थित तब्बल अडीच तास बैठक झाली.यात योग्य तो निर्णय घेऊ.असे श्री केसरकर यांनी सांगितले.त्यानंतर ग्रामस्थांनी माघार घेतली.वाहतूक नियमांचे कठोर पालन केले जाईल कोणाला त्रास होणार नाही.
याची दक्षता घेतली जाईल पुढील सात दिवस दगडखाणी वर कोणत्याही उत्खनन होणार नाही. अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या यावेळी तहसीलदार मोरेश्वर हाडके,शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी,व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.