महिलांनी अत्याचाराविरोधात आवाज उठवावा…

174
2

सुरेखा खोत ;वेंगुर्ल्यात जिल्हास्तरीय सहकारी महिला संमेलन संपन्न…

वेंगुर्ला ता.०३: सावित्रीबाई फुले यांनी महिलांना समाजात चांगले स्थान मिळवून दिले. त्याचा फायदा घेऊन महिलांनी आपल्या होणारा अत्याचार सहन न करता त्याला वाचा फोडणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य औद्योगिक महिला सहकारी संस्था महासंघाचे अध्यक्ष सुरेखा खोत यांनी आज येथे बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक महिला सहकारी संस्थांचा महासंघ मर्या. बुलढाणा आणि महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था मर्या. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग ह्यांच्या संयुक्त विद्यमाने महिला काथ्या कामगार सहकारी संस्थेच्या सभागृहात महिला संमेलन संपन्न झाले. यावेळी अध्यक्षस्थानी त्या बोलत होत्या. नवीन वर्षात महिलांना खंबीर बनविण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून हे एक दिवसीय संमेलन घेण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कृषिभूषण एम.के.गावडे, महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, माजी जि. प.अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते, प.स. सभापती अनुश्री कांबळी, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, जिल्हा बँक विकास अधिकारी बी.जी.बागायतकर, डी.आर. प्रभूआजगावकर, सुर्यकांता संस्थेच्या माधवी गावडे, सावित्रीबाई फुले पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रविणा खानोलकर, ऍड.बाविस्कर, डॉ.मानसी सातार्डेकर तसेच श्रुती रेडकर, सुजाता देसाई, सौ. पोखरणकर, राखी करंगुटकर, दीपिका राणे, संध्या परुळेकर, अरुणा सावंत, रंजना कदम, गीता परब आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात एम.के.गावडे, माधवी गावडे, अनुश्री कांबळी, प्रज्ञा परब, वृषाली जाधव, सीमा मराठे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्य पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना एम.के.गावडे म्हणाले कि, शासनाचे अनेक पुरस्कारप्राप्त प्रज्ञा परब यांचे कार्य अतुलनीय आहे. सावित्रीबाईनी शिक्षणाचा जो धडा दिला तो जपण्यासाठी आज २१ व्या शतकातील सुशिक्षित महिलांनी पुढे यायला हवे. महिलांचा सन्मान झाला पाहिजे.१९८८ मध्ये प्रज्ञा परब यांनी सुरू केलेली काथ्या संस्था आज नावारूपास आली आहे. या जिल्ह्यातील महिला रोजगार वाढेल, त्यावेळी आपला सिंधुदुर्ग समृद्ध होईल. यावेळी अनुश्री कांबळी, दिपलक्ष्मी पडते, ऍड.बाविस्कर, मानसी सातार्डेकर, अस्मिता राऊळ यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी काथ्या उद्योगात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रज्ञा परब यांच्या कार्याचे सर्वानीच कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रज्ञा परब, सूत्रसंचालन श्रुती रेडकर व आभार गीता परब यांनी मानले.

4