सावंतवाडीत उदयापासून जम्प नेटवर्कची वायफाय सेवा सुरू

2

सावंतवाडी/योगिता बेळगावकर
जंप नेटवर्क्सच्या माध्यमातून सावंतवाडी शहर उदया पासून वायफाय झोन होणार आहे.
जंप नेटवर्क्स लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून अनलिमिटेड वायफाय सावंतवाडीकरांना उपलब्ध होणार आहे.उद्या बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी येथे उदया 4 जानेवारीला सकाळी 11वाजता या सेवेचा शुभारंभ होणार आहे.
ही सेवा सर्वांसाठी उपलब्ध आहे. यानिमित्ताने  जंप नेटवर्क्स तर्फे 4 ते 6 जानेवारी, २०२० या कालावधीत सेल्फी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे विजेते टीव्ही, स्मार्ट फोन, ब्ल्यूटूथ स्पीकर्स आणि रिचार्ज व्हाउचर यासारखी  बक्षिसे मिळविण्यास पात्र असतील. त्यांना फक्त एडमिशन सेंटरच्या आसपास आणि त्याभोवती लावलेल्या कॅरेक्टर कट आऊटसह सेल्फी काढून तो त्यांच्या सोशल मीडियावर अपलोड करायचा आहे, आणि जम्प नेटवर्कला #SabkaNetJumpNet हॅशटॅगसह टॅग करायचे आहे.

4