ग्राहकांना दर्जेदार सेवा देणार;शम्मी काजरेकर यांचा विश्वास…
सावंतवाडी ता.०४: येथील बाहेरचावाडा परिसरात सुरु करण्यात आलेल्या “ईसार” या नव्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन ईगल स्टोरचे मालक शम्मी काजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अनेक मान्यवरांनी श्री.काजरेकर कुंटूबियांना शुभेच्छा दिल्या.दरम्यान या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यात येणार आहे,असे श्री.काजरेकर यांनी यावेळी सांगितले.
सावंतवाडीच्या यशात ईसार पेट्रोल पंपच्या माध्यमातून आणखी एक विकासाची भर पडली आहे.त्यामुळे कोलगाव,कुणकेरी,आंबेगाव आदी भागातील लोकांना त्याचा फायदा होणार आहे.या उदघाटन प्रसंगी शम्मी इब्राहीम काजरेकर, महेरनिगार शम्मी काजरेकर, सर्फराझ शम्मी काजरेकर, दाफीया सर्फराझ काजरेकर, अर्शिया सर्फराझ काजरेकर, रझीन सर्फराझ काजरेकर, अब्दुल हामीद शम्मी काजरेकर, फर्रहाना अब्दुल हमीद काजरेकर आणि समस्त काजरेकर परिवार.
आदी उपस्थित होते.