सावंतवाडीत झालेल्या डीजीटल क्रांतीमुळे विद्यार्थी अधिकारी बनतील…

238
2

दीपक केसरकर;जंम्प नेटवर्क कडुन सावंतवाडीत वाय-फाय सेवेचे लोकार्पण…

सावंतवाडी.ता,०४: येेथे जंम्प नेटवर्कच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या डिजिटल क्रांतीमुळे भविष्यात येथील विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतील. सावंतवाडी डिजिटलवाडी होईल. त्याचा फायदा अनेक नवोदित व्यावसायिकांना मिळेल.असा विश्वास माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला.
जंम्प नेटवर्कच्या माध्यमातून सावंतवाडीत उभारण्यात आलेल्या वायफाय सेवेचा शुभारंभ श्री.केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भोसले नॉलेज सिटी चेअरमन अच्युत भोसले,निवृत्त मुख्यमंत्र्यांचे माहिती अधिकारी, सतीश पाटणकर,वसंत केसरकर,जयसिंग पवार,मेघा देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,विनायक जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी युवा सेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर,उपनगराध्यक्षा राजन पोकळे, अशोक दळवी, मायकल डिसोझा, प्रशांत कोठावळे, शब्बीर मणियार, अपर्णा कोठावळे,रोहिणी गावडे,शब्बीर मणीयार,अमेय तेंडोलकर,विश्वास घाग, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

4