दीपक केसरकरांचा आरोप;न्याय मिळण्यासाठी ती चिठ्ठी यादव कुंटूबियांनी पोलिसांकडे द्यावी…
*सावंतवाडी ता.०४:* उमेश यादव आत्महत्या प्रकरणानंतर आपण “त्या” कुंटूबियांना भेटायला गेल्यानंतर त्याठीकाणी असलेल्या एका व्यक्तीकडुन आपलेच शूटिंग करण्यात आले.तो संशयिताचा माणूस असण्याची शक्यता नाकारता येत नाही,असा आरोप खुद्द माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.याप्रकरणात खरे दोषी कोण याच्या खोलात जाण्यासाठी संबंधित कुंटूबांने आपल्याकडे असलेली सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात देणे गरजेचे आहे.त्यासाठी त्यांनी कोणतीही भीती न बाळगता पुढाकार घ्यावा,असे आवाहन श्री.केसरकर यांनी केले.
श्री.केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.ते म्हणाले आपण यादव कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो,त्यावेळी एक व्यक्ती आपली शूटिंग काढत असल्याचे दिसून आले,यावेळी आपण त्या व्यक्तीला विचारणा केली असता आपण त्याच कुटुंबातील असल्याचे त्यांनी सांगितले.परंतु माहीती घेतली असता या प्रकरणात संशयित म्हणून नाव असलेल्या कुटुंबीयांचा तो नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले.त्यामुळे आपण ती शूटिंग त्याला डिलीट मारण्यात सांगितली. मात्र हा सर्व प्रकार चुकीचा आहे,मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना भेटायला गेलं तर कोणी शूटिंग करत नाही,त्यामुळे हे मला अप्रूप वाटले,यामागे काहीतरी काळेबेरे असण्याची शक्यता आहे,त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी करणे गरजेचे आहे.याप्रकरणी संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा असे मला वाटते परंतु तपासाच्या खोलात जाण्यासाठी संबंधित कुटुंबीयाने आपल्याकडे असलेली “सुसाईड नोट” पोलिसांकडे देणे गरजेचे आहे.
श्री.केसरकर पुढे म्हणाले आपण संबंधित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना आधार दिला. यावेळी अशोक दळवी, नारायण राणे, सचिन वालावलकर, मायकल डिसोजा,अमेय तेंडुलकर,अशोक दळवी आदी उपस्थित होते.