मंत्रिपद न मिळाल्यामुळे मी नाराज नाही…

195
2

दीपक केसरकर; पक्षप्रमुखांनी घेतलेला निर्णय मान्य…

सावंतवाडी ता.०४: मला मंत्रिपद न मिळाल्यामुळे मी नाराज नाही,मंत्रीपद देण्याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे.त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे.असे मत माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केले.
श्री. केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांना मंत्रीपदाबाबत विचारले असता, ते म्हणाले या ठिकाणी मी स्वतःनाही,मंत्री कोणाला करावे हा सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुखांचा आहे.त्यांनी घेतलेला निर्णय मान्य आहे.आता मला जिल्ह्यात पक्ष संघटना वाढविण्यासाठी वेळ मिळणार आहे.त्यामुळे याठिकाणी लोकांशी संपर्क साधण्या बरोबर व्यवसायात लक्ष घालणार आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच त्याचा फायदा येथे होईल.यावेळी त्यांनी आमदार नितेश राणे यांना टोला लगावला. बॅरिस्टर नाथ पै सभागृहासाठी आपण एक कोटी साठ लाख रुपये मंजूर केले आहेत.त्यामुळे टाटा कडून पैसे मागण्याचा विषयच नाही.त्यांना पैसे मागायचे असतील तर टाटा सारख्या उद्योजकांकडून मोठी रक्कम मागावी.असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.

4