सावंतवाडी,ता.०४:येथील बाहेरचावाडा परिसरात “एस.एस सर्व्हिस” या नावाने नवीन ऑनलाइन पी.यू.सी सेंटर सुरू करण्यात आले आहे. डिझेल पी.सी सेवा देणारे सेंटर हे शहरातील पहिलेच आहे.
या सेंटरच्या माध्यमातून ग्राहकांना चांगली सेवा देण्यात येणार आहे.या सेंटरचे उद्घाटन नुकतेच पार पडले त्यावेळी मुंज यांना शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील लोकांनी उपस्थिती दर्शविली. हे सेंटर नव्याने सुरू झालेल्या “एसार” पेट्रोल पंप सुरू करण्यात आले आहे. त्याचा फायदा आता येथील वाहनधारकांना होणार आहे. यावेळी नगरसेविका शुभांगी सुकी,पांडुरंग भूषणावर,विशाल पालव आदींनी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.