ओरोस ता.०४: जमिनीच्या वादातून जीवे मारहाण केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या वेंगुर्ला सागरतीर्थ येथील दोघांचा येथील जिल्हा न्यायालय जामीन अर्ज नामंजूर केला.
रमाकांत महादेव गोडकर व ज्ञानेश्वर महादेव गोडकर रा आरवली अशी त्यांची नावे आहे.याकामी सहाय्यक सरकारी अभियोक्ता रूपेश देसाई यांनी सरकारी पक्षाच्यावतीने काम पाहिले.
रमाकांत व ज्ञानेश्वर या दोन संशयितांनी सामायिक जमीन जागेच्या रागतून लाडोबा महादेव गोडकर यांना लोखंडी रॉड व लाकडी दांडयाने मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. यात लाडोबा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. 21 डिसेंबर 2019 रोजी घडलेल्या या घटनेनंतर त्यांना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गोवा बांबूळी रुग्णालयात अधिक उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी संशयित रमाकांत व ज्ञानेश्वर यांच्यावर भादवि कलम 307, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. 28 डिसेंबर रोजी वेंगुर्ला न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. अजुन ते न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी जिल्हा न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.
जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांचा जामीन नामंजूर…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES