ओरोस ता.०४:
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त मालवण तालुक्यातील बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांच्यावतीने घेण्यात आलेल्या देशभक्ती व प्रार्थना गीत स्पर्धेत तब्बल 21 महिलांनी सहभाग घेतला.
बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी केंद्र शाळा कट्टाच्या
विद्यार्थ्यानी समूहगान सादर केले. कु. मलिष्का लोहार हिने सावित्रीबाईचे चरित्र साभिनय कथन केले. यावेळी उपस्थित महिला पालकाना व विद्यार्थ्यांना दीपक भोगटे यानी शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शन केले.
यावेळी घेण्यात आलेल्या महिलासाठी देशभक्तीपर गीत गायन व प्रार्थना गीत गायन स्पर्धा संपन्न झाली. यात 21 महिलानी स्पर्धत भाग घेतला.
या स्पधेचे परीक्षण श्याम तेंडूलकर व भास्कर आकेरकर यानी केले. त्यांना
भगवान काळसेकर, ऋषीकेश चव्हाण, संकेत मेस्त्री यानी संगीत साथ केली.
यावेळी रोटरी क्लब माहिमच्या सदस्या रश्मी पाटील यानी उपस्थित महिलाना मार्गदर्शन केले. रोटरी क्लब माहिमच्यावतीने वैभवी कृष्णा खरात या
गरीब विद्यार्थिनीस सायकल वितरीत करण्यात आली.
या कार्यक्रमाला अविनाश म्हाडगुत, किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, श्री गावडे, भास्कर आकेरकर, रश्मी पाटील, डॉ स्नेहा खाडिलकर, वैष्णवी लाड, संपदा भाट, अपर्णा माईणकर, सावित्री पावसकर, सुजाता पावसकर, गीता नाईक, प्रियांका भोगटे, धुत्रे मॅडम, प्रेरणा लोहार, सायली बोडये व महिला उपस्थित होत्या.
स्वावलंबी झालो तरच सावित्रींचे ऋण फिटतील:- रश्मी पाटील
सावित्रीबाई फुले यानी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महिलाना शिक्षीत केले म्हणूनच आज आपण फार मोठ्या संख्येने शिक्षीत होवू शकलो. त्यांचे ऋण
मानून सर्वानी स्वावलंबी व्हा, असा सल्ला रोटरी क्लब माहिमच्या सदस्या रश्मी पाटील यांनी उपस्थित महिला व मुलींना दिला.