सावंतवाडी पालिकेतील दोन सभापती पदे भाजपाकडे…

2

आज बिनविरोध प्रकीया;नाईक,शेख,लोबो यांना संधी

सावंतवाडी ता.०४: येथील पालिकेच्या विषय समिती सभापतीपदाची निवड प्रकीया आज बिनविरोध पार पडली.यात शिवसेनेकडे असलेल्या तीन सभापतीपदा पैकी दोन सभापतीपदे भाजपाकडे आली आहेत.यात परिमल नाईक यांच्याकडे आरोग्य व क्रीडा तर नासिर शेख यांना पाणी पुरवठा समिती देण्यात आले.महीला बालकल्याण सभापती आनारोजीन लोबों व उपसभापती म्हणून शुभांगी सुकी यांना संधी मिळाली.तर नियोजनचे पदसिध्द सभापती म्हणून उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर यांना संधी मिळाली आहे.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह नगरसेवक राजू बेग, सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, उदय नाईक, सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर, उत्कर्षा सासोलकर, दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, भारती मोरे आदी उपस्थित होते..

4