डी.वाय. पाटील कारखान्‍यातर्फे शेतकऱ्यांना एकरकमी प्रतिटन २८०० रूपये उचल…

82
2

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची माहिती…

वैभववाडी.ता,०४:

गगनबावडा असळज येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने चालु गळीत हंगामामध्ये गळीतास येणा-या ऊसाला एकरकमी प्रती मे. टन २८०० रुपये उचल दिली आहे. सोमवार ३० डिसेंबर रोजी पहिल्‍या पंधरवड्याची ऊस बिले संबंधित शेतक-यांच्‍या खात्‍यावर वर्ग करण्यात आली आहेत. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन, आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिली.
चालू गळीत हंगामात कारखान्‍याने २७ डिसेंबरअखेर १ लाख ६० हजार ७७० मे. टन ऊसाचे गाळप करून सरासरी १०.७४ टक्‍के साखर उता-याने १ लाख ७१ हजार क्विंटल साखर पोत्‍यांचे उत्‍पादन केले आहे. या हंगामाची एफआरपीची रक्‍कम प्रतिटन ३३६८.७५ रूपये असून त्‍यामधून ऊस तोडणी-वाहतूक खर्च ६५३.२५ रूपये वजा जाता कारखान्याची निव्‍वळ एफआरपी प्रती मे.टन २७१५.५० रूपये इतकी होत आहे. तथापि कारखान्‍याने एफआरपीपेक्षा ८५ रूपये जादा उचल देऊन प्रति मे. टन २८०० रुपये एकरकमी देण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतक-यांना त्यांचे ऊसापोटी जास्तीत जास्त दर देता यावा याकरीता कारखान्याचे संचालक मंडळ नेहमीच प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षी कारखान्‍याने जिल्‍ह्यात लवकरात लवकर एफआरपी दिली असून दिवाळीस ऊस बिलापोटी १०० रूपये प्रतिटनाचा जादा हप्‍ता दिला होता. कारखान्याने गतवर्षी एफआरपीपेक्षा प्रती मे.टन ११२ रूपये जादा दिले आहेत. चालू गळीत हंगामात कारखान्याने ठरविलेले ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतक-यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस गाळपास पाठवून देण्याचे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

4