अवयव दान केल्यास, कोणाचे तरी आयुष्य फुलू शकते…

233
2

संजीव लिंगवत;मठ येथील कार्यक्रमात उपस्थितांना आवाहन…

वेंगुर्ले.ता.४:  मृत व्यक्तींच्या पश्चात धर्मानुसार शरीर दफन किंवा दहन करून नष्ट करण्यापेक्षा ते दान केल्यास गरजु रुग्णांच्या जीवनात रोपण केल्यास, नवीन जीवन फुलवू शकता व मरावे परी अवयवरुपी जगावे किंवा जिंदगी के बाद भी जिंदगी फुलू शकेल. या सारखा पुण्य मिळविण्याचा अलौकिक आनंद नाही असे प्रतिपादन जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष व लोकनेते अँड. दत्ता पाटील होमिओपॅथीक मेडिकल काँलेजच्या न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजीव लिंगवत यांनी केले.
मठ येथे अवयवदान, नेत्रदान व देहदान याबाबत सविस्तर माहिती या कार्यक्रमात मान्यवरनी दिली. जनसेवा प्रतिष्ठान, आधार फाऊंडेशन, ग्रामपंचायत मठ व मठ हायस्कूल व खानोलकर ज्युनियर काँलेज यांच्या संयुक्त विध्यमाने मठ हायस्कूल सभागृहात अवयवदान, देहदान व नेत्रदान कार्यशाळा आयोजित केली होती, त्यावेळी डॉ. बोलत होते. निवृत्त मुख्याध्यापक रा. पां. जोशी यांनी यावेळी देहाचा वापर चांगल्या कामासाठी करावा. अवयवदान बाबतीत बरेच गैरसमज आहेत. पण समुपदेशन केल्यास लोकांचे मन वळवून जनजागृती करता येते असे सांगितले. कार्यक्रमाला व्यासपीठावर मठ सरपंच तुळसीदास ठाकूर, आधार फाऊंडेशन अध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर, डॉ. सुदीश सावंत, डॉ हर्षाली ठाकुर, ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी परब, निवृत्त मुख्याध्यापक व जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रा.पां.जोशी, सार्वजनिक विश्वस्त लेखापरीक्षक राकेश धर्णे, मुख्याध्यापक सुनील जाधव, मठ आरोग्य सेविका वर्षा गंगावणे, शिक्षक जी. एम्.गोसावी, मिलिंद खानोलकर, राजु मोबारकर, महेश धुरी, क्षतेजल खानोलकर, मानसी सावंत, परेश नांदोसकर,अंकुर कोंडिलकर, तेजस राऊळ आदी ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विध्यार्थी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत नंदन वेंगुर्लेकर यांनी, प्रास्ताविक शेखर साळगावकर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी केले.

4