कणकवली,ता.०४: तालुक्यातील कलमठ बिडयेवाडी येथे युवतीचा विनयभंग केल्या प्रकरणी अमोल साटम (रा.कलमठ) याचे विरोधात पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयिताचा शोध पोलिस घेत आहेत.२ जानेवारी सायंकाळी ४.३० च्या दरम्यान या तरूणाने त्या युवतीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतले होते. यावेळी तिला मारहाण करून विनयभंग केला.
पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीमध्ये अमोल साटम याने आपल्या मोबाईलवरील व्हॉटस्अॅप हॅक केले. त्याचा जाब विचारण्यासाठी गेले असता लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच विनयभंग देखील केला. गुडनाईट लिक्विड प्राशन केल्यामुळे त्या युवतीची तरूणाच्या तावडीतून सुटका झाली. मात्र गुडनाईट प्राशन केल्याने त्या युवतीची तब्येत बिघडली असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. युवतीच्या फिर्यादीनुसार कणकवली पोलिसांनी अमोल साटम याच्या विरोधात विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.