कणकवली,ता.०४: तालुक्यातील करूळ-कदमवाडी येथून सौ.साक्षी सचिन कदम (वय २९) ह्या चार वर्षाच्या मुलीसमवेत बेपत्ता झाल्या आहेत. याबाबतची फिर्याद त्यांचे पती सचिन कदम (वय ३०) यांनी आज पोलिसांत दिली. साक्षी ह्या २४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता कणकवलीला जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यांच्यासोबत चार वर्षाची मुलगी देखील आहे. मात्र त्या अजूनही घरी न परतल्याने त्या बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचे पती सचिन कदम यांनी दिली. साक्षी ह्या ऑक्टोबर २०१८ मध्ये देखील घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा घरी परतल्या होत्या. तर २४ डिसेंबरला घरातून बेपत्ता झालेल्या साक्षी आणि चार वर्षाच्या मुलीचा ठावठिकाणा समजलेला नाही.
साक्षी यांची उंची साडेचार फुट, केस काळे व मध्यम, चेहरा उभट, डाव्या डोळ्याच्या बाजूस जखमेची खूण, अंगात भगवी साडी व भगवे ब्लाऊज, गळ्यात मंगळसूत्र, मुलीची उंची अडीच फूट, रंग सावळा, चेहरा गोल, अंगात निळा फ्रॉक अशा वर्णनाची बालिका आणि विवाहिता सापडल्यास संपर्क साधावा असे आवाहन तपासी अंमलदार तथा फोंडाघाट दूरक्षेत्राचे हवालदार दयानंद चव्हाण यांनी केले आहे.