सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट संघात बांद्याच्या अब्दुल,रघुवीरची निवड…

2

बांदा ता.०३: येथील अब्दुल गनी जावेद खतीब व रघुवीर मनोज सातोस्कर या युवा क्रिकेटपटूंची अंडर १४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा संघात निवड झाली आहे.

हे दोन्ही खेळाडू उद्यापासून महाराष्ट्र क्रिकेट असोशियन च्या वतीने होणाऱ्या स्पर्धेसाठी कोल्हापुर व पुणे येथे रवाना होणार आहेत. यापूर्वी देखील या खेळाडूंची निवड झाली होती. राज्यस्तरीय स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी आपली चमक दाखविली होती. त्यामुळे या स्पर्धेत त्यांची संघात निवड करण्यात आली आहे. मोठ्या स्पर्धेसाठी निवड झाल्याने दोन्ही खेळाडूंचे बांदा शहरातून अभिनंदन होत आहे.

4