ज्ञानी मी होणार महोत्सवात,बांदा शाळेचे यश…..

2

बांदा.ता,०५:
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित बाल, कला-क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं १ शाळेच्या मुलांच्या संघाने ५० बाय ४ रिले प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
सावंतवाडी तालुक्याचे जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघात बांदा केंद्रशाळेतील प्रणव वाळके, अथर्व चिंदरकर, बाबू पुजीर, समर्थ देसाई, अशोक कदम हे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत आठ तालुक्यातील संघ सहभागी झाले होते. यामध्ये बांदा शाळेतील संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.
या यशस्वी विद्यार्थींना प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री एकनाथ आंबोकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी विद्यार्थींना प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना बांदा शाळेतील रंगनाथ परब, जे. डी.पाटील व सर्व शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थींनी मिळविलेल्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, केंद्रप्रमुख संदिप गवस, सरपंच अक्रम खान, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष जय भोसले ,मुख्याध्यापक सरोज नाईक यांनी अभिनंदन केले. शाळेने मिळविलेल्या या यशाबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

4