बांद्यात आज जनसेवा निधी ट्रस्टच्या पुरस्कारांचे वितरण…

97
2

बांदा.ता.०५:जनसेवा निधी बांदा या संस्थेने यावर्षी जाहिर केलेल्या पुरस्कारांचा वितरण सोहळा आज दुपारी ३.३० वाजता होणार आहे. जि.प.केंद्रशाळा बांदा नं. १ च्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात मालवण येथिल हृदयरोग तज्ञ डॉ. विवेक रेडकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यंदाचे या सोहळ्याचे ३२ वे वर्ष आहे.
यावर्षीचा आदर्श प्राथमिक शिक्षिका पुरस्कार निरवडे नं. १ शाळेच्या दर्शना गजानन शिरसाट यांना, आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार माध्यमिक विद्यालय नेरुर च्या अनंत मधुसुदन सामंत यांना, आदर्श समाजसेवक पुरस्कार धामापूर येथिल सचिन देसाई यांना, आदर्श हायस्कूल मुख्याध्यापक पुरस्कार आदर्श विद्यालय सावडाव कणकवली चे रविंद्र तुकाराम सावंत यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच या सोहळ्यात इंग्रजी, मराठी विषयात प्रथम अमोल अर्जुन गावडे तसेच १२ वीत प्रथम ऐश्वर्या दिपक पेंडसे यांना गौरविण्यात येणार आहे. या सोहऴ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जनसेवा निधी बांदा या संस्थेच्यावतीने डॉ. मिलिंद अरविंद खानोलकर यांनी केले आहे.

4