सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी अनिल परब यांना संधी…?

2

आदीत्य ठाकरेंकडे मुंबईची जबाबदारी,रत्नागिरीत उदय सामंत…

मुंबई.ता,०५: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अखेर अनिल परब यांना संधी देण्यात आली आहे. तर याठिकाणी चर्चेत असलेल्या युवा नेते आदित्य ठाकरे यांना मुंबई शहराची जबाबदारी देण्यात आली आहे.
आज महाविकास आघाडीच्या वतीने पालकमंत्री जाहीर करण्यात आले.यात संबंधित यांची नावे जाहीर करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.नव्या फार्म्यूल्या नुसार राज्याचे एकूण पालकमंत्री पदा पैकी शिवसेनेला १३ राष्ट्रवादीला १२ काँग्रेसला ११ जिल्ह्याचे पालकमंत्री मिळणार आहेत.काही ठिकाणी पालक मंत्रीपदावरून तिन्ही पक्षात अंतर्गत कुरबुरी आहेत.
यात मिळालेल्या पालकमंत्री पालघरची जबाबदारी जितेंद्र आव्हाड, ठाणे एकनाथ शिंदे, रायगड सुभाष देसाई,रत्नागिरी उदय सामंत, जळगाव गुलाबराव पाटील, नाशिक छगन भुजबळ, पुणे अजित पवार आदींचा समावेश असल्याचे समजते.

4